सनशाईन स्कूलच्या विद्यार्थी विराज देशमुख क्रिकेट स्पर्धात चमकला
महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड, खटाव येथे उचित सत्कार
खटाव:- गौरीशंकर ज्ञानपीठ संचलीत सनशाईन इंग्लीश मिडियम स्कूल (सी बी एस ई) खटावचा विद्यार्थी विराज मनोज देशमुख याची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धासाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यानी बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे संघाचा उपकर्णधार व मलिकावीर म्हणून या स्पर्धात त्याला गौरविण्यात आले.
यशाबदल नुकताच खटाव येथे गौरीशंकर नॉलेज सिटीचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप याच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्या प्रमिला टकले कार्यालय अधिक्षक वैभव जठार क्रिडाशिक्षक विशाल निकम मनोज देशमुख माधुरी देशमुख महेंद्र देशमुख अदि प्रमुख उपस्थित होते.यावेळी डॉअनिरुद्ध जगताप म्हणाले विराज देशमुख या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांचा क्रिडा क्षेत्रातील भविष्यकाळ उज्वल आहे त्याची क्रिडाक्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो विराज देशमुख याची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिंलिद जगताप,संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे संस्थेचे कायदेशीर मॅनेजर रवि जगताप यांनी अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र क्रिकेटअसो-चे सचिव मिनाक्षी गिरी सहसचिव चंद्रकात तोरणे यांनी अभिनंदन केले.