Home » राज्य » एसटीमध्ये मोठी मेगाभरती १७,४५० चालक आणि सहायक पदांसाठी रोजगाराची संधी

एसटीमध्ये मोठी मेगाभरती १७,४५० चालक आणि सहायक पदांसाठी रोजगाराची संधी

एसटीमध्ये मोठी मेगाभरती १७,४५० चालक आणि सहायक पदांसाठी रोजगाराची संधी

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) मोठी मेगाभरती होणार आहे. लवकरच एसटीच्या ताफ्यात ८ हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. या बसेस सुरळीत चालवण्यासाठी तब्बल १७,४५० चालक आणि सहायक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

भरती कशी होणार?

ही भरती कंत्राटी पद्धतीने ३ वर्षांसाठी होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.चालक आणि सहायकांना दरमहा सुमारे ₹३०,००० वेतन मिळणार आहे.भरतीची प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून ई-निविदा पद्धतीने सुरू होईल.ही प्रक्रिया राज्याच्या ६ प्रादेशिक विभागांमध्ये विभागून केली जाणार आहे.

रोजगाराची मोठी संधी

या मेगाभरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी साधून घेण्याचे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

एसटीची सध्याची स्थिती

सध्या एसटीकडे एकूण १५,७७४ बसगाड्या आहेत. त्यापैकी १४,९९३ या स्वमालकीच्या तर ७८१ बसगाड्या भाडेतत्त्वावर चालतात.

२०१५-१६ मध्ये एसटीमध्ये १ लाख ८ हजार कर्मचारी होते. मात्र आता ही संख्या कमी होऊन ८७ हजारांवर आली आहे.

आगामी काळात एसटीच्या ताफ्यात २५ हजार नव्या बसगाड्या आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 35 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket