कॅबिनेट मंत्री पदावर असून देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्याच्या आजारी बहिणीची दवाखान्यात येऊन घेतली भेट
भुईंज [महेंद्रआबा जाधवराव ]कार्यकर्ता हेच कुटुंबं मानून मंत्री शिवेंद्रसिंहराजे अजूनही कार्यरत.छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कार्यकर्त्यांच्या सुखः दुःखात कायम त्याच्या पाठीशी असतात याचा प्रत्यय काल कुडाळ ता. जावली येथे पुन्हा एकदा आला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सहकारी आणि युवा उद्योजक समीर आतार यांची बहीण बरेच दिवसापासून आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून त्यांची प्रकुर्ती खराब होती त्या काळात देखील समीर आतार बहिणीची देखभाल करीत औषधउपचार करीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते. मात्र शरीर उपचाराला साथ देत नसल्याने त्यांची तब्बेत बिघडली असून त्यांना उपचारा करीता हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आले आहे
विधानसभा निवडणूकीच्या काळात देखील शिवेंद्रसिंहराजे समीर यांच्या कडून बहिणीच्या तबियतीची माहिती घेत होतेच मात्र निवडणूक निकाला नंतर राज्यात मंत्री मंडळ विस्तार, शपथविधी, हिवाळी अधिवेशन यात व्यस्त असल्याने त्यांना कुडाळच्या आतार कुटुंबीयांची भेट घेता आली नाही, सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्याने त्यांचा अधिकचा वेळ कामात व्यतित झाला मात्र या व्यस्त कामातून देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी वेळ काढतं कुडाळ येथील हॉस्पिटल मधे असलेल्या समीर यांच्या बहिणी साठी येऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ जंगम यांच्या कडून उपचारा बाबत माहिती घेतली व पुढील उपचारा बाबत सूचना केल्या तसेच समीरची बहीण आपलीच बहीण मानून आतार कुटुंबियांना भेटून या संकटातून बाहेर येण्यासाठी बळ देखील दिले
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्यांनी सर्वच जाती धर्मियांना मदतीचा हात दिला, त्यांचेच अनुकरण शिवेंद्रसिंहराजे भोसले करीत असून त्यांनी देखील जात धर्म न पाहता कार्यकर्ता हेच माझे कुटुंबं मानून मदतीचा हात दिला आहे याधीही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले होते, कार्यकर्त्याच्या सुखः दुःखात मी कायम त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे, त्याची कोणतीही अडचण असू द्या, कोणत्याही संकटात माझा कार्यकर्ता असला तर त्याच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही त्याच भावनेतून मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे आतार कुटुंबीयांच्या साठी धावून आले, त्यांच्या या भेटी मुळे आतार कुटुंबाला या आजारा विरोधात लढण्यासाठी आणखी बळ मिळाले असून या भेटी प्रसंगी मंत्री शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समीर आतार यांची बहीण लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.