Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » शिरीष चिटणीस यांनी साताऱ्याबरोबर पुण्यातही केली प्रभावी कामगिरी : मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिरीष चिटणीस यांनी साताऱ्याबरोबर पुण्यातही केली प्रभावी कामगिरी : मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिरीष चिटणीस यांनी साताऱ्याबरोबर पुण्यातही केली प्रभावी कामगिरी : मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

  दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या “स्वरागिनी” या गीत मैफिलीने सातारकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध

 सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांनी स्थानिक पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली. पण ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुण्यामध्येही साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. ही सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले. 

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शाहूपुरी येथे आयोजित केलेल्या “स्वरागिनी” दिवाळी पहाट कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

     कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, दैनिक प्रभातचे संपादक श्रीकांत कात्रे, काका पाटील, लाला शेठ बागवान, अप्पा शालगर, प्रदीप देशपांडे,अनिल चिटणीस, वि. ना.लांडगे शिल्पा चिटणीस, जगदीश खंडागळे, विनायक भोसले, रवींद्र कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, 

  शिरीष चिटणीस यांचे संबंध भाऊसाहेब महाराज, आईसाहेब असतील मी किंवा खासदार उदयनराजे असतील सगळ्यांबरोबर विकासाच्या माध्यमातून त्यांचे संबंध निर्माण झाले. सातारा शहरामधील ६६वे अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये शिरीष चिटणीस यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. तसेच शंकर सारडा आणि इतरही जण महाराजांबरोबर होते त्यामुळे ते साहित्य संमेलन यशस्वी झाले.चिटणीस यांनी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या तसेच शाळेच्या माध्यमातून काम सुरू ठेवले असून आम्हाला ज्या ज्या वेळेस काही कल्पना सुचवतात किंवा एखाद्या विषय कानावर घालतात तेव्हा जेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आलो व यापुढेही करत राहीन, असे आश्वासन दिले.

यावेळी प्राचार्य रमणलाल शहा, श्रीकांत कात्रे, काका पाटील, लालाशेठ बागवान, आप्पा शालगर, प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस, वि. ना. लांडगे, शिल्पा चिटणीस, श्रद्धा कात्रे,जगदीश खंडागळे, विनायक भोसले, रवींद्र कळसकर, विनायक भोसले आदींचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनायक भोसले माझा लहानपणीचा मित्र असून आम्ही लहानपणी विटी दांडू, पतंग उडवणे खेळ खेळल्याच्या आठवणी आमदारांनी सांगितल्या. 

  शिरीष चिटणीस म्हणाले गेली सतरा वर्षे शाहूपुरी च्या या प्रांगणात दिवाळीचा कार्यक्रम सुरू आहे. या वास्तूचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले होते, यांची आठवण त्यांनी सांगितली.

     सातारच्या राजघराण्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो त्याचे ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर उभा आहे, असे त्यांनी सांगितले. 

    1985 सालापासून मी पिग्मी एजंट चे काम करत होतो ते आज 2025 पर्यंत या 40 वर्षांमध्ये सातारच्या राजघराण्यात कै. श्री.छ. अभयसिंहराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, आईसाहेब महाराज यांच्यामुळे ज्या ज्या वेळेस मला संधी मिळत गेली त्यापेक्षा त्यांचा पाठिंबा मिळत गेला ही माझ्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे मी पुण्यात जाऊन जे कार्य करू शकतो त्यामध्ये राजघराण्यांचे मोठे महत्त्व आहे, असे चिटणीस यांनी स्पष्ट केले.  रमणलाल शहा यांचे मनोगत झाले.   यानंतर “स्वरागिनी” या गीत मैफिलीचे मा. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणांत शाहूपुरीचा मध्यवर्ती चौकात.. मराठी हिंदी सुश्राव्य सुमधुर गीतांना रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली..दिवाळीच्या पहाटे सर्व रसिक श्रोते मंत्र मुग्ध झालेले होते.

      स्वरागिनी ” या सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा श्रवणीय ,सुमधुर “दिवाळी पहाट” कार्यक्रमात सुजाता दरेकर, सुधीर मुळे ,जितेंद्र पवार, गीतांजली पाटील , श्वेता जाधव यांनी आपली सुमधुर गीते रसिक श्रोत्यांसाठी सादर केली असून तबला व ढोलकी ची साथ शुभम दाखले यांनी दिली सिंथेसायझर प्रवीण जाधव,ऑक्टोपॅड ला अमोल वाघ यांची साथ लाभली असून कार्यक्रमाचे निवेदन संजय क्षीरसागर यांनी केले आहेया कार्यक्रमाचे संयोजन सुजाता दरेकर यांचे असून कुलदीप पवार यांची ध्वनी व्यवस्था लाभली

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket