Home » राज्य » शिक्षण » शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अजित बिरामने व श्वेता बिरामने यांना ‘सातारा प्राईड २०२६’ पुरस्कार जाहीर

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अजित बिरामने व श्वेता बिरामने यांना ‘सातारा प्राईड २०२६’ पुरस्कार जाहीर

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अजित बिरामने व श्वेता बिरामने यांना ‘सातारा प्राईड २०२६’ पुरस्कार जाहीर

पाचगणी – शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य करणाऱ्या शालोम इंटरनॅशनल स्कूल पांचगणी चे संचालक अजित बिरामने आणि श्वेता अजित बिरामने यांना सातारा मीडिया सेवन तर्फे देण्यात येणारा ‘सातारा प्राईड २०२६’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पाचगणीतील शालम इंटरनॅशनल स्कूलची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक साहेबराव बिरामने यांनी केली. या शैक्षणिक उपक्रमाला त्यांच्या पत्नी तसेच संपूर्ण बिरामणे कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि संस्कार आजही संस्थेच्या कार्यातून दिसून येतात.

आज हा समृद्ध शैक्षणिक वारसा अजित बिरामणने आणि श्वेता बिरामने समर्थपणे पुढे नेत आहेत. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाण्यास सक्षम बनवणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शैक्षणिक उत्कृष्टता वाढवणे, विविध कौशल्यांचा विकास घडवणे, चांगले संस्कार आणि शिस्तबद्ध जीवनशैली घडवणे यासाठी शालम इंटरनॅशनल स्कूल पाचगणीचे नाव देशभरात प्रसिद्ध झाले आहे.

बिरामने कुटुंबीयांचा शैक्षणिक वारसा पुढे नेत अजित बिरामने आणि श्वेता बिरामने यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे ही संस्था शिक्षण क्षेत्रात एक आदर्श ठरत आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेवन तर्फे यंदाचा ‘सातारा प्राईड २०२६’ पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket