संजय जाधव यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान
खंडाळा : गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा “आदर्श कामगार पुरस्कार २०२४” हा पुरस्कार अहिरे ता. खंडाळा येथील संजय जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील कामगारांसाठी सातारा येथील गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुरस्कार वितरीत केला जातो. वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा यामध्ये समावेश केला जातो. यावर्षी गोदरेज अँड बॉईसचे संजय जाधव यांना हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास पुणे विभागाचे अपर आयुक्त शैलेंद्र पोळ, तसेच गोदरेज अँड बॉईसचे अभय पेंडसे , सातारा जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले , प्रतिष्ठानचे अध्यक्ष इकबाल काझी , अशोकराव जाधव यासह प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना शैलेंद्र पोळ म्हणाले, या प्रतिष्ठानचे हे कार्य निश्चितच दखल घेण्याजोगे आहे. मी स्वतः प्रतिष्ठानला लागेल ती मदत करीन. आदर्श कामगार पुरस्कार घेणाऱ्या कामगारांनी समाजात जबाबदारीने वागावे व प्रतिष्ठानच्या कामात सक्रिय व्हावे.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने संजय जाधव , मकरंद पवार , सुरेश मोरे , रविंद्र पवार , शेखर पवार या आदर्श कामगार पुरस्कार्थींचा यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानाचा फेटा, मानाचा किताब देऊन सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत देशपांडे यांनी केले तर अभिजित शिंगटे यांनी आभार मानले.