अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सची जिद्द; ५० वृक्षांसाठी ५० खड्डे तयार

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सची जिद्द; ५० वृक्षांसाठी ५० खड्डे तयार

NCC कॅडेट्सची जिद्द; ५० वृक्षांसाठी ५० खड्डे तयार

सातारा : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत यशोदा शिक्षण संस्थेने यावर्षी १,००० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या अभियानांतर्गत २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या वृक्षारोपणासाठी साधना इंग्लिश मीडियम स्कूलने पुढाकार घेतला असून, ५० झाडांच्या लागवडीची जबाबदारी NCC कॅडेट्सवर सोपविण्यात आली आहे.

वृक्षारोपणाच्या तयारीसाठी साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सनी खडकाळ व कठीण जमिनीत तब्बल ५० खड्डे स्वतःच्या मेहनतीने तयार केले. प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता कॅडेट्सनी जिद्द, शिस्त, टीमवर्क आणि पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी यांचे उत्कृष्ट उदाहरण घडविले.

या उपक्रमासाठी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक  डॉ. दशरथ सगरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली धुमाळे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या पाठबळामुळे कॅडेट्समध्ये पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी विशेष उत्साह निर्माण झाला.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे NCC Officer निलिका पाटील आणि NCC Trainer सुमित पाटील यांनी केवळ मार्गदर्शन न करता कॅडेट्ससोबत प्रत्यक्ष श्रमदान केले. कठीण जमीन फोडताना त्यांनी कॅडेट्ससोबत काम करत नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला.

कॅडेट्सच्या या मेहनतीमुळे ५० वृक्षांसाठी मजबूत पाया तयार झाला असून, येत्या वृक्षारोपणातून परिसर अधिक हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

“आजचा घाम… उद्याची हिरवाई!” या संदेशातून कॅडेट्सनी पर्यावरण संवर्धनाची प्रेरणादायी वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या या निस्वार्थ मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket