Home » राज्य » शिक्षण » श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व श्री.मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय(कला,विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभाग)देऊरचा सन्मान सोहळा पालकमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.ना. महेशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न

श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व श्री.मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय(कला,विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभाग)देऊरचा सन्मान सोहळा पालकमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.ना. महेशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न 

श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व श्री.मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय(कला,विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभाग)देऊरचा सन्मान सोहळा पालकमंत्री मा. ना. शंभूराजे देसाई व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.ना. महेशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न

महाराष्ट्र राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री : माझी शाळा, सुंदर शाळा” या शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सातारा जिल्हा स्तरीय पारितोषिक वितरण समारंभ आज सातारा जिल्हा परिषदेच्या, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्याचे पालक मंत्री सन्मा. ना.शंभूराजे देसाई व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मा.ना. महेशजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था संचलित श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व श्री.मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय (कला, विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभाग), देऊर यांनी कोरेगाव तालुक्यात प्रथम आणि सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रुपये तीन लाख रकमेचे पारितोषिक आज प्राप्त केले.

शालेय नित्य उपक्रमा बरोबरच शिस्त,गुणवत्ता,परिसर विकसन,परसबाग निर्मिती व उपयोजन, स्वच्छता मॉनिटर उपक्रमातील भरघोस सहभाग, एन.सी.सी.,स्काऊट अँड गाईड यांची प्रभावी अंमलबजावणी, प्रत्यक्ष मतदान यंत्राद्वारे व काल मर्यादित मतदान प्रक्रियेतून प्रतिनिधींची निवड, बाल संसद व त्याची समग्र कार्यवाही, विद्यार्थी आरोग्य तपासणी, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शिल्लक अन्नावरील प्रक्रिया संयंत्र उभारणी,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सोलर प्लॅट व पवन ऊर्जा वापर, कचरा व्यवस्थापन,शिवीमुक्त अभियान,प्लास्टिक निर्बंध, आयसीटी लॅब व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट योजनेंतर्गत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, वाचन संस्कृती जोपासण्यासाठीचे नाविण्यपूर्ण उपक्रम, हस्तलिखितांचा खजिना या व अशा अनेक अंगांनी झालेल्या अंतर्बाह्य परिक्षणातून व सांघिक परिश्रमातून हे यश साकार झाले.

कार्यक्रमाचे प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री.जितेंद्र डुडी, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री समीर शेख,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा मा. याशनी नागराजन, मा. प्रभावती कोळेकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व मा. शबनम मुजावर , शिक्षणाधिकारी (प्राथमिक )जिल्हा परिषद तसेच कोरेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री. धनंजय चोपडे, शिक्षण विस्तार अधिकारी,कोरेगाव मा.सौ.वनिता मोरे मॅडम उपस्थित होत्या.

विद्यालयाच्या वतीने हा सन्मान संस्था चेअरमन मा. श्री.हणमंतराव कदम -पाटील (काका ) व मा. प्राचार्य श्री.उत्तमराव महामुलकर,विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.श्री.राजाराम कृष्णा कदम व शाळा प्रमुख श्री.प्रदिप ढाणे,व्यवसाय शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक व नियंत्रक प्रा.श्री.सुरेश निंबाळकर यांनी स्वीकारला. सोबत तंत्रस्नेही अध्यापक श्री.विश्वास गुरव व प्रा.श्री.सचिन दाहोत्रे,प्रा.सौ. नीलम सावंत,आमचे मार्गदर्शक व गटशिक्षणाधिकारी सन्मा.श्री.धनंजय चोपडे साहेब,माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.प्रभावती कोळेकर मॅडम, सातारा तालुका गट शिक्षणाधिकारी सन्मा.श्री.रवींद्र खंदारे साहेब, पिंपोडे खुर्द केंद्राचे नूतन केंद्र प्रमुख सन्मा.श्री.शिवाजीराव तावरे साहेब व क्रीडा शिक्षक श्री.बाळासाहेब काटकर,कार्यालय प्रमुख श्री.चंद्रकांत कदम,ग्रंथपाल श्री.अजय काळे व्यासपीठावर उपस्थित होते.

पारितोषिक प्राप्तीबद्दल श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था, देऊरचे सचिव मा.श्री.राजेंद्र कदम व सर्व विश्वस्त मंडळ, शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.देवेंद्र कदम व सदस्य, विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. शर्मिला उदयसिंह पवार व सदस्य, माता पालक संघ अध्यक्षा सौ. सिमा प्रदिप कदम व सदस्या, पालक संघ अध्यक्ष श्री.श्रीकांत कदम व सदस्य,ग्रामस्थ,पालक व आजी- माजी विद्यार्थी यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन

Post Views: 117 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन पाचगणी – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Live Cricket