राखिव वनक्षेत्रात वनवा लावणे प्रकरणी एक जन ताब्यात
सातारा -दिनांक 22.04.2026 रोजी वनरक्षक रोहोट श्री. प्रकाश शिंदे हे आपल्या वनक्षेत्रात फिरती करीत असताना मौजे कासाणी फॉ.क.नं. 268 मध्ये आरोपी सखाराम कोंडीबा बादापुरे रा. कासाणी ता.जि. सातारा वणवा लावत असताना प्रत्यक्ष जागेवर वनगुन्हा करताना पकडले, भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (बी) (एफ) अंतर्गत प्र.गु.रि.क्र. 09/2026 वनरक्षक रोहोट यांनी 22.04.2026 रोजी नोंद केला आहे. सदर आरोपी गुन्ह्यास कबूल आहेत.
सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा, श्री. प्रदिप रौधंळ सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. दिंगबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदिप जोपळे, वनक्षेत्रपाल (प्रा.) सातारा श्री. रा. सु. काशिद, वनपाल रोहोट श्री. प्र. य. शिंदे, वनरक्षक रोहोट यांनी केली.
आवाहन
वणवा लावणे सक्त मनाई आहे. अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास । वर्ष मुदतीपर्यतचा कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा दोन्ही होऊ शकतात, तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास तसेच वनहद्दीत विनापरवाना प्रवेश करणे, अतिक्रमण करणे, प्लास्टीक कचरा टाकणे, वनक्षेत्रात सांडपाणी सोडणे, शिकार करणे, अवैध लाकूड वाहतूक करणं असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचो माहिती वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.




