अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » पुण्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

पुण्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

पुण्यात शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

पुणे :पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार पठारे यांना मारहाण करण्यात आली. 

शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर वडगावशेरी मतदारसंघात खळबळ उडाली आहे. आमदार पठारे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तिकीटावर ते विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पठारे यांनी पराभव केला.

आमदार पठारे हे शनिवारी संध्याकाळी लोहगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार) गटामधील काही कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. आमदार पठारे यांना काही लोकांनी मारहाण केली.या मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket