गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी कचरामुक्त वर्धनगड ’वर्धनी माता मंदीर परिसर उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहीम नवीन शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवावी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण सभापतींना निवेदन बिरवाडी गावचे सुपुत्र प्रा. श्रीकांत घाडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल पुण्यात भव्य गौरव! पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मध्ये शासकिय कॉम्प्युटर व तांत्रिक कोर्सेस ना 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश देणे सुरू  SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद
Home » राज्य » शिक्षण » देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे

देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे 

देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे

सातारा प्रतिनिधी- शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करा.देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात ते काम निस्वार्थी व प्रामाणिकपणे करावे असे प्रतिपादन केंद्र समन्वयक डाॅ. केशव मोरे यांनी केले.‌ सातारा येथील आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२४ या दोन वर्षांच्या शुभचिंतन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.सुधीर खरात होते. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.         

यावेळी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक डॉ. वंदना नलवडे, प्रा.डाॅ.विनय धोंडगे, प्रा.डाॅ के.आर.मोरे, प्रा. सुधीर खरात हे होते. डॉ. केशव मोरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत सुट्टीतील बी. एड. आपण छात्र अध्यापकांनी चांगल्या प्रकारे सर्व प्रात्यक्षिके,सराव पाठ घेऊन पूर्ण केले.या महाविद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक शिक्षक आज शासकीय सेवेत शिक्षणाधिकारी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदावर कार्यरत आहेत.आपल्यापैकीही काही शिक्षक निश्चितीच स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदावर जातील. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक माजी विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या पदावर काम करीत आहे. प्रा. सुधीर खरात म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयात निश्चितच सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाते.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम येथे गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे.येथून शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडलेले अनेक शिक्षक आज अधिकारी पदावर कार्यरत आहेत. हे या महाविद्यालयातील प्राचार्यांपासून सर्व प्राध्यापकांनी ज्ञानार्जन केलेचे फलित आहे. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतुल बोराटे, सुवर्णा साळवी, शुभांगी बोबडे, पांडुरंग शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दिपक पवार यांनी केले. सूत्रसंचालन गजानन देशमाने, प्रणिता गायकवाड व केशर माने यांनी केले व आभार प्रदिप रवलेकर यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी

गणेशोत्सवापूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर एसटी बस सेवा सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आग्रही मागणी चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी आंबेनळी घाटातून मुंबई,

Live Cricket