उस्मान भाई खारकंडे यांनी पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये भगवा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये प्रवेश
महाबळेश्वर –शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपशहर प्रमुख उस्मान भाई खारकंडे यांनी पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये भगवा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब यांचे शिवसेनेचे नेतृत्व मान्य करून शिवसेनेत प्रवेश केलेले ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ पंडित व गोविंद कदम यांनी शंभूराजे देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मंत्री महोदय यांना शिवसेना ही संघटना तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली. यावेळी शंभूराजे देसाई साहेबांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू, माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, शहर संघटक सुनील ढेबे, उपशहर सचिन गुजर, सचिन जेधे, विभाग प्रमुख संदेश भिसे, महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे विद्यमान संचालक सतीश ओंबळे हेमंत साळवी, गौरव ओंबळे, वाई महिला संपर्क वर्षा आरडे, महाबळेश्वर महाबळेश्वर तालुका महिला मेघा चोरघे, शहर महीला संघटीका सुनीता फळणे, आशा जाधव, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, शितल ओतारी सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
