नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव; फिटनेसचा दिला प्रेरणादायी संदेश

45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव; फिटनेसचा दिला प्रेरणादायी संदेश

45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव; फिटनेसचा दिला प्रेरणादायी संदेश

फलटण, प्रतिनिधी : वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापणे किंवा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी फलटण रनर्स फाउंडेशनचे सदस्य तथा ढवळ येथील शिक्षक श्री. बाळासाहेब शिंगाडे यांनी आपल्या 45 व्या वाढदिवसानिमित्त 45 किलोमीटर धाव पूर्ण करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

10 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजता विंचुर्णी फाटा, बिरदेव नगर येथून त्यांनी धावण्यास सुरुवात केली. अविरत धावत सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांनी तब्बल 45 किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांनी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले.

या विशेष धाव मोहिमेदरम्यान सहभागी धावपटूंसाठी हायड्रेशन व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमात डॉ. प्रसाद जोशी, फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. महेश शिंदे, अनुजा त्रिपुटे मॅडम तसेच फलटण रनर्स फाउंडेशनचे सदस्य आणि सेलिब्रेट लाईफ ग्रुपचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सर्वांनी श्री. शिंगाडे यांच्यासोबत धावत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री. बाळासाहेब शिंगाडे यांच्या या फिटनेसप्रेमी आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत अनेकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ठरली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket