मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » राज्य » शेत शिवार » मुंबईत मुसळधार; ‘एनडीआरएफ’ची टीम तैनात

मुंबईत मुसळधार; ‘एनडीआरएफ’ची टीम तैनात

मुंबईत मुसळधार; ‘एनडीआरएफ’ची टीम तैनात

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी कायम राहिला. सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे मुंबईत तीन एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या आहेत. सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

एनडीआरएफतर्फे विभिन्न ठिकाणी टीम तैनात 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईमधील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे. वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय तीन टीम मुंबईत आणि एक टीम नागपूर येथे नियमित तैनात करण्यात आली आहे. सखल भागात आणि भूस्खलन प्रवण भागात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफ सतर्क आहे.

लोणावळ्यात मागील 24 तासांत 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. आतापर्यंत लोणावळ्यात 2173 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहे. या धरणाला एकूण 85 दरवाजे असून 85 पूर्णपणे उघडले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पुण्यात सकाळपासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे वेधशाळेकडून शहरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात आजचा पाणीसाठा

खडकवासला : ७४%

वरसगाव : ४४%

पानशेत : ५७%

टेमघर : ३८%

मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात खराब हवामानामुळे अनेक विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात एअर इंडियाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुसळधार पावसामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम होत आहे. वाहतुकीचा वेग कमी असल्याने प्रवाशांना लवकर विमानतळावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket