Home » राज्य » शिक्षण » खासदार नितीनकाका पाटील यांचे जिल्हयात होणार जंगी स्वागत

खासदार नितीनकाका पाटील यांचे जिल्हयात होणार जंगी स्वागत

खासदार नितीनकाका पाटील यांचे जिल्हयात होणार जंगी स्वागत

सातारा- महायुतीकडून राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणुन निवडुण आलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील यांचे मंगळवारी जिल्हयात आगमन होणार आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षातर्फे व राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने खासदार नितीनकाका पाटील यांचे जोरदार जंगी स्वागत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, खासदारपदी निवड झाल्यानंतर मंगळवार दि. २७ रोजी प्रथमच जिल्हयात येत असल्याने खासदार नितीनकाकांचे स्वागत मोठया स्वरूपात करणार असून त्याची सुरूवात शिंदेवाडी येथुन होणार आहे. सकाळी १०.३० वाजता शिंदेवाडी येथे आगमन झाल्यानंतर तेथील स्वागत झाल्यानंतर ११ वाजता शिरवळ येथे आगमन व स्वागत, खंडाळा येथे ११.३० वाजता स्वागत करणार आहेत. दुपारी १२ वाजता वेळे येथील स्वागत झाल्यानंतर १२.३० वाजता कवठे येथील स्व. किसन वीर यांच्या पुतळयाला खासदार नितीनकाका पाटील हार घालुन १ वाजता भुईंज येथे स्वागत तर पाचवड येथे १.३० वाजता पोहचणार असून तेथे वाई तालुक्यातील कार्यकर्ते स्वागत करणार आहेत. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे दुपारी २ वाजता कोरेगाव व सातारा तालुक्यातील कार्यकत्यांकडून खासदार नितीनकाका पाटील यांची पेढेतुला व जंगी स्वागत समारंभ होणार आहे. तदनंतर दुपारी २.४५ वा काशिळ आगमन व स्वागत, दुपारी ३.०० वाजता इंदोली पेर्ले येथे आगमन व स्वागत, ३.१५ वाजता उंब्रज येथे स्वागत होऊन कराड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ३.४५ वाजता खासदार नितीकाका पाटील पुष्पहार अर्पण करणार आहेत. तदनंतर सायंकाळी ४ वाजता प्रितीसंगम येथील भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेवुन अभिवादन केन्यानंतर राजेश पाटील वाठारकर यांच्या निवासस्थानी राखीव वेळ ठेवला असल्याची माहिती प्रमोद शिंदे यांनी दिलेली आहे.

खासदार नितीनकाका पाटील यांच्या स्वागतासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा जिल्हयातील, कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, मकरंदआबा व नितीनकाकाप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 76 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket