अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » मान्सून गोव्यात दाखल; पुढील २ ते ३ दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार

मान्सून गोव्यात दाखल; पुढील २ ते ३ दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार

मान्सून गोव्यात दाखल; पुढील २ ते ३ दिवसात मान्सून कोकणात दाखल होणार

मुंबई- शेतकऱ्यांसह सर्वांकडून आतुरतेने वाट पाहिली जात असलेला मान्सून आज गोव्यामध्ये दाखल झाला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

तसेच गोव्यानंतर आता पुढच्या काही दिवसांतच मान्सून सीमा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ९ जून दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवमान खात्याने म्हटले आहे. दरम्यान,समुद्र प्रचंड खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने  १० जून २०२६ या काळात दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळचा किनारी भाग, तसेच लक्षद्वीप आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.

काल केरळमध्ये धडकलेला मान्सून आज गोव्यात दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यंदा मान्सूनचे केरळ आणि महाराष्ट्रातील आगमन लांबल्याने बळीराजासह सर्वसामान्यांना पावसाची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने यंदा २६ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी ४ जून उजाडावी लागली. केरळमधील या विलंबाचा परिणाम महाराष्ट्रातील आगमनावरही झाला आहे. आता राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अजूनही ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket