Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मार्गदर्शन

माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मार्गदर्शन

माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मार्गदर्शन प्रमोद शिंदे यांची माहिती

 वाई प्रतिनिधी -सातारा जिल्ह्यात पोलादी पुरूष म्हणुन ओळखले जाणारे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे मार्गदर्शन मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता व महाआरोग्य शिबीर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असल्याची महिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारखान्याचे उपाध्यक्षे प्रमोद शिंदे यांनी दिली.

 प्रसिब्दीपत्रकात पुढे म्हटले आहे की, लक्ष्मणरावतात्या पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणे बोलणे ही त्यांची ख्याती होती. त्यामुळेच तात्यांना जिल्ह्यामध्ये पोलादी पुरूष म्हणून ओळख होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यालादेखील तात्यांनी ताकद देऊन त्यांच्या मनामध्ये राज्य करणारा असा नेता होता. तात्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमठविलेला दिसून येतो. तात्यांच्या जाण्याने आम्हा कार्यकर्त्यांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी भरून काढण्याचे काम राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील करीत आहेत. कारखाना कार्यस्थळावर किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्येशालिटी हॉस्पिटल, शेद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाई येथील ग्रामीण रूग्णालय व भुईज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये रक्तदान, मोफत मोतीबिंदू निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मेवाटप सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यत होणार आहेत. यामध्ये संपुर्ण शरीराची तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत ई.सी.जी., हृदयविकार मेंद विकार, बायपास शस्त्रक्रिया, बी. पी., हिमोग्लोबीन, मधुमेह, एच. आय. व्ही., संसर्गजन्य आजार, टी. बी., सिपिलीस, कावीळ, ऑन्जिओग्राफी, ऑन्जिओप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाची तपासणी, आतड्याचा कॅन्सर, किडणी व मुत्राशयाचा कॅन्सर, फिट, पॅरेलिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायूंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्तशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या व इतर शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांची मोफत तपासणी करून सर्व प्रकारचे औषधोपचार करण्यात येतील. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रम व महाआरोग्य शिबीरास कार्यक्षत्रातील सर्व सभासद बंधू- भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड तालुक्यातील करवडी येते दोघांचा बुडून मृत्यू

Post Views: 31 कराड तालुक्यातील करवडी येते दोघांचा बुडून मृत्यू कराड प्रतिनिधी – पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह युवकाचा

Live Cricket