अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर पालिकेच्या विषय समित्यांची निवड संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व, सभापती पदांच्या निवडी जाहीर

महाबळेश्वर पालिकेच्या विषय समित्यांची निवड संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व, सभापती पदांच्या निवडी जाहीर

महाबळेश्वर पालिकेच्या विषय समित्यांची निवड संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व, सभापती पदांच्या निवडी जाहीर

महाबळेश्वर (प्रतिनिधी)महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सदस्य नामनिर्देशन, सभापती निवड आणि स्थायी समितीची रचना करण्यासाठी आज, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्व समित्यांची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेची सुरुवात आणि प्रक्रिया

सभेची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते संजय बाळकृष्ण जंगम आणि गिरिस्थान नगरविकास आघाडीचे गटनेते कुमार गोरखनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने विषय समिती सदस्यांची नामनिर्देशन पत्रे सादर केली. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी अर्जांची छाननी केल्यानंतर नवनिर्वाचित सभापती आणि सदस्यांची नावे अधिकृतपणे घोषित केली.

नूतन विषय समित्या व सभापती खालीलप्रमाणे:

१. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती:

 सभापती- रोहित बबनराव ढेबे

 सदस्य: पल्लवी संदीप कोंढाळकर, विद्या शरद बावळेकर, कुमार गोरखनाथ शिंदे.

२. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती:

 सभापती: संजय बाळकृष्ण जंगम

 सदस्य:राहुल प्रकाश पिसाळ, प्रियंका अक्षय वायदंडे, नीता आकाश झाडे.

३. पाणीपुरवठा आणि जलनिःसारण समिती:

 पदसिद्ध सभापती:नासिर युनूस मुलाणी (उपनगराध्यक्ष)

 सदस्य: संतोष बबन शिंदे, संतोष मारुती आखाडे, राजू इस्माईल नालबंद.

४. सार्वजनिक बांधकाम व नियोजन आणि विकास समिती:

  सभापती: अफझल मुबारक सुतार

 सदस्य: संतोष मारुती आखाडे, विमल पांडुरंग पार्टे, विमल पांडुरंग विरामणे.

५. महिला व बालकल्याण समिती:

 अध्यक्षा: संगीता दत्तात्रय वाडकर

सदस्य: विद्या शरद बावळेकर, रेश्मा किरण ढेबे, शबाना अल्ताफ मानकर.

स्थायी समितीची रचना

नगरपरिषदेची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘स्थायी समिती’ देखील गठीत करण्यात आली असून, यामध्ये सर्व विषय समित्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे:

 पदसिद्ध सभापती:सुनील लक्ष्मण शिंदे (नगराध्यक्ष)

 सदस्य: नासिर युनूस मुलाणी, संजय बाळकृष्ण जंगम, रोहित बबनराव ढेबे, अफझल मुबारक सुतार, संगीता दत्तात्रय वाडकर.

उपस्थितीया विशेष सभेस नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन सभापतींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket