मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅनची सुविधा
शुक्रवार दिनांक १४ जुन २०२४ रोजी मिनाक्षी डायजेस्टिव डीसिज सेंटर, मिनाक्षी हॉस्पिटल सातारा येथे लिव्हर स्कॅन (फायब्रोस्कॅन) ही तपासणी उपलब्ध होणार असून डायबेटिस, लठ्ठपणा तसेच लिव्हर विकार असणाऱ्या रुग्णांसाठी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी समजली जाते. मोठ्या शहरात उपलब्ध असणारी ही तपासणी आता आपल्या साताऱ्यात उपलब्ध होत असून या सुविधेचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन पोटविकार तज्ञ व लिव्हर विकार तज्ञ डॉ. प्रतापराव गोळे यांनी केले आहे. रुग्णांनी 9764681500 किंवा 7498808149 या क्रमांकावर फोन करून आपली नाव नोंदणी करावी.