सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रेल्वेच्या हद्दीत विकासकामाना गती आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश

रेल्वेच्या हद्दीत विकासकामाना गती आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश

रेल्वेच्या हद्दीत विकासकामाना गती आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश

कराड प्रतिनिधी -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रेल्वे विभागाचे बांधकाम प्रमुख माधव जाधव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात रेल्वेची हद्द मोठ्या प्रमाणात आहे. सध्या चालू असलेल्या विस्तारीकरणामुळे अनेक ठिकाणी नागरिकांशी गैरसोय झालेली असून त्या ठिकाणी काम करायचे असेल तर रेल्वे प्रशासनाची परवानगी लागते. त्यामुळे काम करण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी व लोकांच्या मनाची सोय होण्यासाठी लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी मतदारसंघातील महत्त्वाचे असलेले नेहरवाडी–रहीमतपूर रस्ता, टकले रस्ता तसेच तारगाव–वाठार रस्ता या कामांचा प्रगती आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित कामे जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आमदार घोरपडे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

तसेच रेल्वे मार्गालगतच्या इतर प्रलंबित विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली. कराड उत्तर मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक समन्वय ठेवून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी सांगितले.या बैठकीमुळे मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket