Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सत्ता असो किंवा नसो कायम जनसामान्यांच्या सेवेत -युवा उद्योजक किरण बाबर

सत्ता असो किंवा नसो कायम जनसामान्यांच्या सेवेत -युवा उद्योजक किरण बाबर 

सत्ता असो किंवा नसो कायम जनसामान्यांच्या सेवेत -युवा उद्योजक किरण बाबर 

   खुदी कर बुलंद इतना की हर तकदीर से पेहले खुदा खुद बंदे से पुछे बता ‘तेरी रझा क्या है…!अगदी याच सुप्रसिद्ध शेर शी तंतोतंत जीवनप्रवास तुम्ही करत आलात!यातूनच तुम्हाला पत्रकारिता,विमा सल्लागार,जिल्हा वसुली अधिकारी आणि आता भैरवनाथ टेक्सटाईल चे डायरेक्टर या कामात स्थैर्य प्राप्त झाले…! वाई तालुक्यातील कापडाचे प्रसिद्ध व्यापारी मा. किरण बाबत यांचा आज वाढदिवस 

     किरण बाबर म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा..प्रामाणिक..स्पष्ट..परखड..पण तरीही मैत्रीसाठी तत्वांच्या पल्याड जाणारा सन्मित्र…!या सन्मित्राची माझी भेट अशीच एकदा वाईत झाली..!किरणजी,आपण त्यावेळी तरुण भारत मध्ये किकली वरून कार्यरत होता…आम्ही त्या काळात पत्रकारितेत अगदीच नवखे होतो…किरणजी,आपली तेव्हा ‘भुईंज’ करांशी जवळीक असल्याने आपण आमच्या पेक्षा 2 पावले पुढे गेला होतात.. पण,तुमचं ‘पुढंच पाऊल’ कधीच आपल्या संबंधाच्या आड आपण येऊ दिल नाही..त्यामुळेच त्या पहिल्या भेटीतच आपली।दोस्ती पक्की झाली..पुढे पुढे आम्ही विमा व्यवसायाकडे वळलो तेव्हाही बाबर साहेब आपण आमचे प्रेरणास्रोत म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत राहिलात…जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जगा ही संतांची शिकवण आपण नेहमीच वापरलीत…!त्यामुळे आपण मित्रांच्या,नातलगांच्या गुड बुक मध्ये नेहमीच वावरत आलात..!

   पत्रकारितेच्या अनुभवाच्या जोरावर आपण लोकप्रिय दैनिका मध्ये जाहिरात प्रतिनिधी ते जिल्हा वसुली अधिकारी अशी यशाची कमान कायम चढती ठेवलीत…!लोक जोडत गेलात अन आपल्या पदाच्या माध्यमातून लोकांची कामे करत गेलात…किरणजी,वसुली अधिकाऱ्याला देखील ‘आवडीने’ बोलवलं जाण्याइतपत आपण आपल्या सहकऱ्यांना वसुलीचे वेगवेगळे फंडे वापरून निश्चित केलत..!

किरणजी,व्यावसायिक होण्याच आपलं स्वप्न मात्र दैनिकाच्या नोकरीत मागे पडत होत..म्हणून आणि म्हणूनच तुम्ही आर्थिक स्थैर्याबरोबरच मान सन्मान मिळवून देत असलेली नोकरी सोडून दिलीत…!वयाच्या चाळीशी कडे झुकताना माणूस सहसा आपलं करिअर बदलण्याच्या भानगडीत पडत नाही…साहेब,आपण मात्र परतीचे सगळे दोर कापून भैरवनाथ टेक्सटाईल चा शुभारंभ पाचवड सारख्या मध्यवर्ती भागात केला..दर्जा,योग्य दर आणि आजवर कमावलेली माणसे याच्या जोरावर आपण उद्योजक म्हणून यशस्वी झाला आहात… गरिब,मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तर बांधायचाय चांगला बस्ता तर किरण बाबर यांनाच भेटा अशी प्रसिद्धी आपण वाई जावली खंडाळा,भोर कोरेगाव ते कराड तालुक्या पर्यंत मिळवली आहे..हे आपले यश आजवर केलेल्या प्रामाणिकपणाचे आणि आई वडिलांच्या पुण्याईचे आहे…

     किरणजी,मागे कधीतरी आम्ही आपणास स्टेजवर जोरदार भाषण देताना पाहिलंय…गावच भलं व्हावं,भागाचा नावलौकिक वाढावा ही विकासाची दृष्टी आपणास लाभली आहे.त्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात आपला वावर सहजतेने होतो..आपल्या अंगभूत नेतृत्वगुणांचा ग्रामविकासाला फायदा व्हावा,म्हणून लोकांनी आपल्याकडे मागे ग्राम पंचायत निवडणूक लढविण्याचा आग्रह केला.’आता लढायचं’ अस पक्क ठरवून आपण निवडणुकीला सामोरे गेलात.या मध्ये आपणास अपयश आले.मतदारांचा कौल आपण नम्रपणे स्वीकारलात..त्याच दिवशी दुपारी तुम्ही आपल्या सहकऱ्यांना,मतदारांना भेटलात.त्यांचे आभार मानले,अन पुन्हा ‘भैरवनाथ’ मध्ये जाऊन बसलात.तुम्ही शांतपणे सत्य स्वीकारलं…स्वतःला स्पष्ट सांगितलं ‘गड्या राजकारण हे आपलं काम नव्हे….!

   किरणजी,आपण एक बार मैने कमिटमेंट की तो अपने आप की भी नहीं सुनता या कॅटगीरीतले.त्यामुळे तुम्ही एकदा ठरवलं तर ,त्याचा अथक पाठपुरावा करता,काम पूर्णत्वास नेल्याशिवाय आपण स्वस्थ बसत नाही.सामाजिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हाच अंगभूत गुण लागतो,किरणजी, आपण तर यात निपुण आहात..!

   खरतर,आपण एखाद्यावर खूप प्रेम करत असतो, त्याच्या प्रत्येक कामगिरीची,कर्तबगारीची आपण कौतुक असते…पण ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला संधी सापडत नसते.किरणजी,आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ही संधी आम्हाला प्राप्त झाली..योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता,झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि चांगलं तेच करण्याचा ,देण्याची प्रामाणिकता यामुळे आपण व्यवयसायिक आणि व्यक्ती म्हणून खूप मोठी कामगिरी कराल..!तुमच्या स्वप्नपूर्तीचा काळ येवो,अन तो अखंडित राहो, या सदिच्छेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सचिन ननावरे,बावधन

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket