Post Views: 114
कराडनजीक पाचवड फाटा परिसरात कारने घेतला पेट
कराड प्रतिनिधी -पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा नजीक एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. आगीत कार जाळून खाक झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनास्थळावरून मिळाले माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा ते पुणे लेनवर कराड जवळ पाचवड फाट्या नजीक एका कारने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, सुनील कदम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारची पाहणी केल्यानंतर तसेच माहिती घेतल्यानंतर तात्काळ अग्निशामक विभागास फोन करून माहिती दिली.
