Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड उत्तर मध्ये 1.41 कोटीचा निधी मंजूर- आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मध्ये 1.41 कोटीचा निधी मंजूर- आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मध्ये 1.41 कोटीचा निधी मंजूर- आमदार मनोजदादा घोरपडे यांची माहिती

कराड -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये तारळी धरणाचे पुनर्वसन झालेल्या गावातील नगरी वसाहतीतील विकास कामांसाठी एक कोटी 41 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 33 गावचे पुनर्वसन झालेले आहेत. गेली अनेक वर्ष त्यां गावाना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत त्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मंत्रालय व कलेक्टर ऑफिस येथे बैठक घेतली होती. व संबंधित गावांना ज्या नागरी सुविधा मिळाल्या नाहीत त्यासाठी अंमलबजावणी करण्यास सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कराड उत्तर मधील तारळी धरणातील पुनर्वशीत गावातील नागरी सुविधांसाठी एक कोटी 41 लाख 14 हजार रुपये चा निधी मंजूर झालेला आहे.

यामध्ये सावरघर येथे आरसीसी गटर बांधणे, भांबे येथे अंतर्गत आरसीसी गटर बांधणे, सावरघर येथे विद्युत पंपास वीज पुरवठा करणे, कारंजोशी येथे पाणी पुरवठा विहिरीस वीज पुरवठा करणे,तसेच भांबे,सावरघर, कारंजोशी येथे दहन भूमीचा लोखंडी सांगाडा तयार करणे इत्यादी कामासाठी निधी मंजूर झालेला आहे.उर्वरित उरमोडी, धोम, उत्तरमांड, तारळी आधी पुनरवशीत गावांच्या उर्वरित समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 63 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket