काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६:गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार-सरपंच विलास शिर्के
केळघर प्रतिनिधी:वरोशी ( ता . जावली ) येथील श्री काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ हा नेहमीप्रमाणे तिथि नुसार न होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे त्यात बदल करण्यात आला आहे गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे अशी माहिती सरपंच विलास शिर्के यांनी दिली ..
या वर्षी गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाअभिषेक, तर संध्याकाळी ७ वाजता जागरण व गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानंतर शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे .
काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी परिसरासह दूरदूरच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील या बदलाची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व नियोजनानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.



