अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित-एकनाथदादा ओंबळे

मेढा(प्रतिनिधी)-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना राज्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अहोरात्र काम करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जावळी तालुक्यातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कविता एकनाथ ओंबळे यांचा विजय निश्चित आहे.असा विश्वास शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथदादा ओंबळे यांनी व्यक्त केला.

जावळी तालुक्यातील दक्षिण विभागात मतदारांशी संवाद साधताना ओंबळे बोलत होते. शिवसेना म्हणजे संघर्ष , शिवसेना म्हणजे  एक चळवळ आहे . आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे . तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून कायम संघर्ष करत आलो आहे . जनतेचे प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या . असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी केले .

 शिवसेनेचे कुसुंबी जि प गटाचे उमेदवार कविताताई ओंबळे , पंचायत समिती आंबेघर तर्फ मेढा गणाचे उमेदवार आतिष कदम, कुसुंबी गणाचे उमेदवार सुनिता दुंदळे यांच्या प्रचारार्थ कुसुंबी दक्षिण विभागातील सायळी , धनकवडी , काळोशी , करंडी , मालचौंडी , दुंद , कुसुंबी , गांजे , लिगाडेवाडी , मोहाट आदि गावे , वाड्या वस्त्यांवर  प्रचार दौरा केला .

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे , शिवसेना ( उबाठा ) तालुकाधक्ष संतोष चव्हाण ,  विठ्ठल पवार ,  विलास दुंदळे , शंकर वेंदे , संतोष शेलार , अमृतलाल शेडगे , संजय कदम , राम कदम ,चंद्रकांत धनावडे , दत्तात्रय कदम , संतोष रेवले , युवराज शेडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे म्हणाले , प्रस्थापित भाजपाच्या विरोधात ही जनशक्ती एकवटली आहे . सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी . त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी दोन्ही शिवसेना , राष्ट्रवादीसह इतर पक्ष एकत्र येऊन लढा देत आहोत . त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे . आरोग्यदूत , सामाजिक कार्यकर्ते एकनाथ (दादा) ओंबळे यांच्या निस्वार्थी समाज कार्यामुळे माझा विजय निश्चित आहे . असे शिवसेनेचे उमेदवार कविताताई ओंबळे यांनी सांगितले .

      कुसूंबी दक्षिण विभागातील गावा गावात , घरात कार्यकत्यांनी पत्रके वाटत आपले मत शिवसेनेला , आपले मत धनुष्य बाणाला असे पटवून देत उमेदवारांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी गावागावात स्वागत करण्यात आले . ग्रामस्थ , महिला , युवक उपस्थित होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket