आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ध्यास फाउंडेशन सातारा यांनी आयोजिलेल्या महिला उत्सव रनला उत्तम प्रतिसाद.
सातारा, दोन मार्च 2025 रोजी आयोजलेल्या महिला उत्सव रनला सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. महिलांनी महिलांसाठी महिलांच्या कडून आयोजलेल्या या उत्सव रन मध्ये महिला दोन वयोगटांमध्ये धावल्या. या रन मध्ये आठ वर्षांच्या मुलींपासून 72 वर्षांच्या आजींपर्यंत सहभाग नोंदविला. तीन किलोमीटर फन रन मध्ये प्रथमच सहभाग घेणाऱ्या बहुसंख्या महिला होत्या. हसत खेळत अतिशय चांगल्या वातावरणात रन पार पडली.
सात किलोमीटरच्या कॉम्पिटिशन मध्ये चार वयोगटांनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिला वयोगट 14 ते 24 मध्ये कुमारी साक्षी संजय जयदल, द्वितीय क्रमांक पार्वती महेश मेसी व तृतीय क्रमांक कुमारी अंजली सुशांत काळभोर यांनी मिळविला
दुसरा वयोगट २५ ते 40 या वयोगटांमध्येकुमारी सुजाता शेळके प्रथम क्रमांक सुश्मिता वाडेकर द्वितीय क्रमांक व कोमल गोळे तृतीय क्रमांक मिळविले. सात किलोमीटर ४१ते ५५ या वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला सौ स्मिता सचिन शिंदे द्वितीय क्रमांक श्रीमती अल्मास अमर मुलानी व तृतीय क्रमांक सौ. स्मिता बोरकर 55 आणि वर या वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला डॉक्टर नीलिमा उदय वनारसे द्वितीय क्रमांक सौ सुनीता बोराटे तर तृतीय क्रमांक मिळवला सौ सुजाता अरुण पवार यांनी.
विजेतांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तराळकर, ध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर वैजयंती ओतारी, स्फूर्ती च्या अध्यक्ष सौ. श्रुती दीक्षित सचिव सौ कविता देशमुख व त्यांच्या सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रथम क्रमांकास पाच हजार एक बक्षीस व रुहा यांच्याकडून डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, साई कलेक्शन यांच्याकडून रुपये पाचशेच्या गिफ्ट व्हाउचर व सौ कल्याणी भोसले यांच्याकडून मोत्याचा हार देण्यात आले.
द्वितीय क्रमांक रुपये 3000 डिजिटल कार्ड रुपये पाचशेचे गिफ्ट व्हाउचर तृतीय क्रमांक रुपये दोन हजार रुपये व पाचशे रुपये देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुचित्रा काटे यांनी फ्लॅगऑफ केला. या प्रसंगी प्रायोजक, ब्रँड ॲम्बेसिडर व संयोजन समितीचे सर्व सदस्य यांचा सत्कार घेण्यात आला. या रनमध्ये 385 महिलांनी सहभाग नोंदविला.
