नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ध्यास फाउंडेशन सातारा यांनी आयोजिलेल्या महिला उत्सव रनला उत्तम प्रतिसाद.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ध्यास फाउंडेशन सातारा यांनी आयोजिलेल्या महिला उत्सव रनला उत्तम प्रतिसाद. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ध्यास फाउंडेशन सातारा यांनी आयोजिलेल्या महिला उत्सव रनला उत्तम प्रतिसाद. 

सातारा, दोन मार्च 2025 रोजी आयोजलेल्या महिला उत्सव रनला सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. महिलांनी महिलांसाठी महिलांच्या कडून आयोजलेल्या या उत्सव रन मध्ये महिला दोन वयोगटांमध्ये धावल्या. या रन मध्ये आठ वर्षांच्या मुलींपासून 72 वर्षांच्या आजींपर्यंत सहभाग नोंदविला. तीन किलोमीटर फन रन मध्ये प्रथमच सहभाग घेणाऱ्या बहुसंख्या महिला होत्या. हसत खेळत अतिशय चांगल्या वातावरणात रन पार पडली. 

सात किलोमीटरच्या कॉम्पिटिशन मध्ये चार वयोगटांनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिला वयोगट 14 ते 24 मध्ये कुमारी साक्षी संजय जयदल, द्वितीय क्रमांक पार्वती महेश मेसी व तृतीय क्रमांक कुमारी अंजली सुशांत काळभोर यांनी मिळविला 

दुसरा वयोगट २५ ते 40 या वयोगटांमध्येकुमारी सुजाता शेळके प्रथम क्रमांक सुश्मिता वाडेकर द्वितीय क्रमांक व कोमल गोळे तृतीय क्रमांक मिळविले.‌ सात किलोमीटर ४१ते ५५ या वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला सौ स्मिता सचिन शिंदे द्वितीय क्रमांक श्रीमती अल्मास अमर मुलानी व तृतीय क्रमांक सौ. स्मिता बोरकर 55 आणि वर या वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला डॉक्टर नीलिमा उदय वनारसे द्वितीय क्रमांक सौ सुनीता बोराटे तर तृतीय क्रमांक मिळवला सौ सुजाता अरुण पवार यांनी. 

विजेतांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तराळकर, ध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर वैजयंती ओतारी, स्फूर्ती च्या अध्यक्ष सौ. श्रुती दीक्षित सचिव सौ कविता देशमुख व त्यांच्या सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रथम क्रमांकास पाच हजार एक बक्षीस व रुहा यांच्याकडून डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, साई कलेक्शन यांच्याकडून रुपये पाचशेच्या गिफ्ट व्हाउचर व सौ कल्याणी भोसले यांच्याकडून मोत्याचा हार देण्यात आले. 

द्वितीय क्रमांक रुपये 3000 डिजिटल कार्ड रुपये पाचशेचे गिफ्ट व्हाउचर तृतीय क्रमांक रुपये दोन हजार रुपये व पाचशे रुपये देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुचित्रा काटे यांनी फ्लॅगऑफ केला. या प्रसंगी प्रायोजक, ब्रँड ॲम्बेसिडर व संयोजन समितीचे सर्व सदस्य यांचा सत्कार घेण्यात आला. या रनमध्ये 385 महिलांनी सहभाग नोंदविला.‌

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket