मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण मागे; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी 30 जूनच्या आत सर्व गोष्टी रितसर करून घ्या, जरांगे यांची सूचना
जरांगेंकडून सरकारला एका महिन्याची वेळ, 13 जूलैची डेडलाईन
जालना : मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी 30 जूनच्या आत सर्व गोष्टी रितसर करून घ्या, अशा सूचना मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांच्या भेटीसाठी राज्याचे शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये गेले होते. शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे.
