Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मी विधानसभा निवडणूक लढणारच: अनमोल कांबळे यांची माहिती 

मी विधानसभा निवडणूक लढणारच: अनमोल कांबळे यांची माहिती 

मी विधानसभा निवडणूक लढणारच: अनमोल कांबळे यांची माहिती 

सातारा :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य लोकांमध्ये देखील आहे. अशातच जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आपण अपक्ष लढणार असल्याची माहिती पाचगणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी दिली.विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार अनमोल कांबळे यांनी बोलून दाखवला असून त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरवात केली आहे.

विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी अनमोल कांबळे पाचगणी.

लोकांच्या आग्रहाखातिर ही निवडणूक लढणार आहे. सर्वसामान्यांसाठी ऑन द स्पॉट निर्णय या पद्धतीने निवडणूक लढणार आहे. जनतेचा विजय निश्चित होईल आणि ऐतिहासिक निकाल लागेल अनमोल कांबळे म्हणाले. माझ्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाने प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. रस्त्यावरची लढाई सभागृहात न्यायाची अशी भावना सर्वसामान्यांची आहे. पांचगणीचा आवाज महाराष्ट्राच्या सभागृहात घुमला पाहिजे. माझी उमेदवारी ही सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेसाठी आहे. पर्यटन विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देणे हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले.सामान्य माणूस म्हणजे आपला पक्ष आहे. त्यांच्याच आशिर्वादाने मी निवडून येणार, असं विश्वास अनमोल कांबळे यांनी व्यक्त केला.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket