अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मेढ्यात शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मिळणार सुलभ आरोग्यसेवा

मेढ्यात शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मिळणार सुलभ आरोग्यसेवा

मेढ्यात शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन; नागरिकांना मिळणार सुलभ आरोग्यसेवा

मेढा : ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्य केंद्र (UHWC), शिवाजीनगर, मेढा या केंद्राचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे मेढा शहरासह परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या या नागरी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रुपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती नितीन मगरे, बांधकाम समिती सभापती शिवाजीराव देशमुख, विरोधी पक्षनेते बापूराव जवळ, नगरसेवक सुशांत कांबळे, शिवाजी गोरे, हरिश्चंद्र तिवाटणे, धनंजय पवार, नगरसेविका प्राजक्ता पार्टे व मोनिका जवळ, भाजप शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह पत्रकार सुरेश पार्टे, नारायण शिंगटे, नितीन पवार, डॉ. अमित ढाणे, जयराज गायकवाड व संकेत करंजेकर अजय तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी केंद्राची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. केंद्रामध्ये नागरिकांना प्राथमिक तपासणी, उपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

मेढा शहर व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे नागरी आरोग्य केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः सामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील गरजू रुग्णांसाठी हे केंद्र सोयीचे ठरणार असून प्राथमिक आरोग्यविषयक समस्या स्थानिक पातळीवर हाताळण्यास मदत होणार आहे.

शहरातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी वारंवार दूरवर जावे लागू नये, तसेच वेळेत प्राथमिक उपचार व आरोग्यविषयक सल्ला मिळावा, या दृष्टीने या केंद्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शासनाच्या आरोग्य सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना या केंद्रामुळे आणखी बळ मिळणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनी उपलब्ध आरोग्य सेवांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket