हिंदु बहुजन सन्मान यात्रेचा नायगावातून प्रारंभ आमदार योगेश टिळेकर करणार नेतृत्व
खंडाळा : संत सावता क्रांती परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी हिंदु बहुजन सन्मान यात्रा पहिला टप्पा नायगाव ते चौंडी असा काढण्यात येणार असुन या यात्रेचा शुभारंभ शुक्रवार दि ४ ऑक्टोबर रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभुमी असणाऱ्या नायगाव ता खंडाळा येथून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले.
आमदार योगेश टिळेकर हे संत सावता क्रांती परिषदच्या माध्यमातून राज्यभर हिंदु बहुजन सन्मान यात्रा काढणार आहेत, या यात्रेचा पहिला टप्पा नायगाव ते चौंडी आहे, स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभुमी असणाऱ्या नायगाव ता खंडाळा येथुन आमदार योगेश टिळेकर या यात्रेची सुरुवात करणार आहेत.यानंतर आमदार योगेश टिळेकर वाई येथील कार्यकर्त्यशी संवाद साधणार असुन त्यानंतर पोवई नाका सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीशी संवाद साधणार असुन त्यानंतर ओबोसी बांधवाचा मेळावा होणार आहे, त्यानंतर आ. टिळेकर हे जेष्ठ भाजपा कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत,यांनतर ते खेड कोंडवे व कुडाळ येथे ओबीसी बांधवाशी संवाद साधणार आहेत, तसेच सोनार व कातकरी समाज बांधवाची देखील भेट घेणार आहेत.