Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर

सातारा: रोबोटिक शस्त्रक्रियेतील तज्ञ डॉ. सौरभ गिरी यांनी आजपर्यंत ६५० एमआयएस खुबा प्रत्यारोप आणि दीड हजारांहून अधिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोप शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. डॉ. गिरी हे येत्या गुरुवारी, २९ जानेवारी रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत करणार आहेत.

नवीन नांव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. फॉलोअप पेशन्टना नेहमीचे शुल्क असेल. नव्या – जुन्या अशा दोन्ही रुग्णांना एक्सरे तपासणीत ५० टक्के सवलत दिली जाईल. डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की, पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

डॉ. सौरभ गिरी हे २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket