नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दहावीच्या परीक्षेत हिंदवी स्कूलचे घवघवीत यश

दहावीच्या परीक्षेत हिंदवी स्कूलचे घवघवीत यश

दहावीच्या परीक्षेत हिंदवी स्कूलचे घवघवीत यश

सातारा- येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये हिंदवी पब्लिक स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण, ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, २५ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, २२ विद्यार्थ्यांनी ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळवले. त्यात असावरी विजय जाधवने ९८.२० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविला, तर शिवांजली नंदकुमार शिंदे व अमृता अरविंद पवार ९६.६० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कृष्णाली डफळे (९५.४० टक्के) हिने तृतीय क्रमांक व रिया जोशी (९५.२०टक्के) हिने चौथा क्रमांक मिळविला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, खजिनदार अश्विनी कुलकर्णी, पंचकोशीय गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, प्राथमिक विभागप्रमुख शिल्पिता महांगडे, पंचकोशाधारित गुरुकुल प्रमुख प्रसाद जोशी व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket