मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल वायरमन , कॉम्प्युटर ऑपरेटर कोर्सेस चे निकाल जाहीर  नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा येथील विद्यार्थ्यांची गारमेंट इंडस्ट्री मध्ये निवड
Home » राज्य » शिक्षण » हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये झाली पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी

हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये झाली पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी

हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये झाली पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी

सातारा -श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ यांच्या प्रतिमेस व श्री व्यास गुरु यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी सर, हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी दी, हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती काटकर दी, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील दी, गुरुकुल प्रमुख संदीप दा उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचे व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनींनी कार्यक्रमाची सुरुवात गुरूविषयक प्रार्थनेने केली. 

तसेच त्या विद्यार्थ्यांनी गुरूंवर आधारित एक छोटीशी नाटिका सादर केली. ज्युनिअर के.जी मधील विद्यार्थिनी कुमारी विधात्री गोडबोले हिने मुखोद्गत असलेला गीतेचा पंधरावा अध्याय सादर केला. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी गुरूंची महती सांगणाऱ्या गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. त्यानंतर सर्व गुरुजनांची विद्यार्थ्यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमोडे सर यांच्या हस्ते सर्व गुरुजन यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही गुरुपौर्णिमेनिमित्त भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व सांगत ते स्वतः कसे घडले याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले. व गुरु बद्दल आदर कशाप्रकारे ठेवला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अमित कुलकर्णी सर यांनीही विद्यार्थ्यांना गुरु विषयी कशाप्रकारे आदर ठेवला पाहिजे, गुरुची महती किती थोर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने याची जाणीव ठेवून आपल्या गुरूंविषयी आदरभावना ठेवली पाहिजे याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील कु. किशोरी भोसले हिने केले. तर स्कूल विषयक माहिती हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका मा.ज्योती काटकर यांनी सांगितली. व उपमुख्याध्यापिका या. शिल्पा पाटील दी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ  

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   मुंबई, दि. १३ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये

Live Cricket