गौरीशंकर सुखात्मे स्कूलचा शौर्य शिंदे कराटे स्पर्धेत चमकला राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष कामगिरी, काता इव्हेंट मध्ये कास्यपदक तर फाईट प्रकारात रौप्यपदकाचा ठरला मानकरी
लिंब – महाराष्ट्र राज्य बोङोकाॅन कराटे असोसिएशनच्या वतीने मुंबई ,ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गौरीशंकरच्या डॉ. पी .व्ही. सुखात्मे स्कूल लिंब येथे इयत्ता सहावीत शिकत असलेला शौर्य किरण शिंदे यांनी अकरा वयोगट कराटे स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्याने काता इव्हेंट प्रकारामध्ये तृतीय क्रमांकसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे तर कुमिते म्हणजेच फाईल प्रकारामध्ये द्वितीय क्रमांकसह रौप्यपदक पटकावले आहे त्याने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल गौरीशंकरच्या डॉ.पी. व्ही. सुखात्मे स्कूलमध्ये त्याचा उचित सत्कार संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रभारी प्राचार्य घनशाम चव्हाण, नितीन शिवथरे अदि प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की शैक्षणिक ज्ञानाइतकेच जीवनात क्रीडा क्षेत्राचे महत्त्व आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीच्या खेळात उत्तुंग कामगिरी करून स्वतःला सिद्ध करावे शौर्य शिंदे यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्राप्त केलेले यश स्कूलच्या नांवलौकिकात भर घालणारे आहे. प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राची विशेष आवड निर्माण होण्यासाठी विविध खेळातील तज्ञ प्रशिक्षकांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवून आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची तयारी करून घेत आहोत शौर्य किरण शिंदे यास कराटे प्रशिक्षक संतोष माने याचे मार्गदर्शन लाभले.
शौर्य किरण शिंदे च्या कराटे स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप ,उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप ,जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर ,कायदेशीर मॅनेजर रवी जगताप, स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कराटे क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीचे ध्येय ठेवून वाटचाल करण्याचा निर्धार शौर्य किरण शिंदे यांनी केला असून त्यासाठी तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करीत आहे राज्य स्पर्धेतून प्राप्त झालेल्या यशामुळे त्याचा आत्मविश्वास उंचविला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे स्वप्न उराशी घेऊन शौर्य शिंदे परिश्रम घेत आहे आई-वडील शिक्षक व कराटे प्रशिक्षक संतोष माने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे.
