गौरीशंकर देगाव फार्मसी चे चार विद्यार्थी जीपीएटी परीक्षेत चमकले.
देगाव-दर्जात्मक शिक्षणात नेहमीच अग्रेसर ठरणाऱ्या गौरीशंकर च्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी जीपीएटी परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले. शैक्षणिक वर्ष सन 2025 26 मध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली व आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यामध्ये सुमित काटुळे, साहिल पवार, गौरव गुरव,सानिका कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ नागेश अलुरकर उपप्राचार्य डॉ योगेश गुरव रजिस्टर हेमंत काळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एस एस बुंदेल यांनी अभिनंदन केले.
जीपीएटी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान- मदनराव जगताप
दर्जात्मक शिक्षणाबरोबरच नाविन्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. औषध निर्माण क्षेत्रांत सक्षम व कौशल्य विकसित मनुष्यबळ विकसित करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची जडणघडण केली जात आहे. त्यामुळेच विद्यार्थी विविध स्पर्धात्मक स्पर्धेत उज्वल यश प्राप्त करीत आहेत या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मदनराव जगताप अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा.




