महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा
महाबळेश्वर: दि.महाराष्ट्राचे लाङके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस महाबळेश्वर शहरांमध्ये विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, आई जगदंबे च्या मूर्तीस तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची फित कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात महाबळेश्वर नगरीच्या माजी नगरसेविका विमलताई ओंबळे तसेच श्री.सतिशभाऊ ओंबळे,संजय ओंबळे यांच्या संहयोगाने ५०% च्या सवलतीच्या दरात घरगुती आटा चक्की, वॉटर फिल्टर, इन्स्टंट फिल्टर, चूल शेगडी नागरिकांना माफक दरात मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली.
त्याचप्रमाणे सातारा येथील नामांकित डॉक्टर दीपांजली पवार यांच्या माध्यमातून मधुमेह व रक्तदाब यांचे मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आले. त्याचप्रमाणे रुद्रा वेलनेस अँड फिटनेस सेंटर आरोग्य सल्लागार विकास सावंत यांच्या माध्यमातून महाबळेश्वर वासियांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित मान्यवर तसेच मा. नगरसेवक यांनी सुद्धा स्वतःचे आरोग्य तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगीशजी पाटील, सातारा जिल्ह्याचे संपर्क नेते एकनाथजी ओंबळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या दिपाली शेलार यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी श्री किसन शेठ शिंदे,डी.एम.बावळेकर,अफझल भाई सुतार, संदीप साळुंखे, एडवोकेट संजय जंगम,न.पा.चे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, तोफिक पटवेकर, अल्ताफ मानकर फकीरभाई वलगे, श्रीकांत पारठे आदिंच्या ऊपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर साबणे रोडचे शाखाप्रमुख श्री सचिन चव्हाण यांनी शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरउपाध्यक्ष अनिरुद्ध धोत्रे तसेच श्रीकांत जांभळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी महाबळेश्वर शहरांमध्ये प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक उस्मान खारखंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, सतीश ओंबळे,उपशहर प्रमुख सचिन गुजर, शहर संघटक सुनील ढेबे,सचिन जेधे, राजू पंडित उस्मान खारकंडे,गोविंद कदम, मेघा चोरगे,सुनिता फळणे,आशा जाधव,मंगल फळणे,प्रभा नायङू,अपूर्वा ङोईफोङे,शितल ओतारी,संदेश भिसे हर्ष साळुंखे आदिंनी विशेष सहभाग घेतला. सुत्रसंचलन विजय भाऊ नायङू यांनी केले तर राजुभाऊ पंङीत यांनी आभार व्यक्त केले.
