दीपलक्ष्मी नागरी सह.पतसंस्था,सातारा. ही कला, साहित्य, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारी अग्रेसर पतसंस्था आहे : कुलपती- ऋषीहूड विद्यापीठ दिल्ली,माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू
सातारा -(प्रतिनिधी)दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात काम करत असताना कला, साहित्य, संस्कृती चे जतन आणि संवर्धन करणारी अग्रेसर पतसंस्था आहे. असे गौरवोद्गार कुलपती- ऋषीहूड विद्यापीठ दिल्ली,माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेट कार्यक्रमात काढले.सदर कार्यक्रम प्रसंगी केंद्र सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी केंद्र शासन सहकार चळवळ बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी करत असल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमासाठी सुरेश साखवळकर ,संस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस ,डॉ.संदीप श्रोत्री, सहाय्यक निबंधक सातारा राहुलजी देशमुख,
सी.ए .अजित रानडे, संध्या चौगुले, श्रीराम नानल, व्यवस्थापक विनायक भोसले मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना सुरेश प्रभू म्हणाले कोणत्याही सहकारी संस्थेचा जन्म हा खऱ्या अर्थाने समाजाचा पुनरार्थ करण्यासाठी झाला पाहिजे. सहकारी संस्था ह्या समाजासाठी असतात. ज्या समाजात त्या कार्य करत आहेत त्या समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असतात. त्याचप्रमाणे आपली संस्था काम करत आहे.तुम्ही सहकारात आर्थिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विविध कला, साहित्य ,संस्कृती तसेच पर्यावरण पूरक वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले आहेत . त्याचप्रमाणे त्याचे जतन व संरक्षण केले आहे ही महत्त्वपूर्ण बाब आहे.
सुरुवातीच्या कालावधीमध्ये मानवाच्या जन्मापूर्वी निसर्गामध्ये अब्जावधी झाडे होती. परंतु जंगल तोडीमुळे आज जंगलांचे वाळवंट होत आहे. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. तसेच सदर प्राचीन संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी सर्व समावेशक प्रयत्न झाले पाहिजेत. येणाऱ्या कालावधीत अशी परिस्थिती येईल की कला नष्ट होईल, संस्कृती नष्ट होईल, संस्कृती नष्ट होऊ नये ती जतन व संवर्धन करण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न उल्लेखनीय आहे . असे बोलून त्यांनी पुढील कार्यासाठी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
शिरीष चिटणीस म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्था ही महाराष्ट्रात कला, साहित्य, संस्कृती, संगीत, पुस्तक प्रदर्शन यासाठी सहकाराबरोबरच कार्य करीत आहे.तसेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत
डॉ. सदानंद मोरे, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, श्रीपाल सबनीस,डॉ द.भी. कुलकर्णी, राजा दीक्षित,डॉ विश्वास मेहंदळे यासारख्या वैचारिक दिशा देणाऱ्या साहित्यिकांची व्याख्याने संस्थेने आयोजित करून समाजाला विचारांचा वारसा देण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
अशा या सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या संस्थेस सुरेश प्रभू यांची आजची सदिच्छा भेट ही महत्वपूर्ण बाब आहे.
सातारा हे राजधानीचे ठिकाण असून स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुण्याप्रमाणे सातारा ही आघाडीवर होता. ज्याप्रमाणे सुरेश प्रभू पुण्याच्या दौऱ्यावर येऊन वैचारिक दिशा देतात त्याचप्रमाणे सातारला ही वरचेवर भेट देऊन आम्हाला प्रोस्थाहीत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्था येणारे कालावधीमध्ये कला, साहित्य, संस्कृती , संगीत तसेच वैचारिक कार्यक्रम आयोजित करून समाजाच्या प्रगतीसाठी अविरत कार्य करत राहील.
सदरच्या सदिच्छा भेटीमध्ये संस्थेचे चेअरमन -संस्थापक शिरीष चिटणीस यांनी सुरेश प्रभू यांना संस्थेने आयोजित केलेले कला, साहित्य, संस्कृती तसेच वैचारिक दिशा देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे कार्यक्रमांची माहिती दिली.
संस्थेच्या विविध कार्यक्रमाच्या छायाचित्राचे प्रदर्शन हे गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी संचलित कला महाविद्यालय सातारा या कॉलेजच्या विद्यार्थिनी ऋतुजा लोहार,सिद्धी देवरुखकर, दिया रणदिवे, तसेच त्यांच्या समूहाने तयार केले होते.
सदर प्रसंगी संस्थेच्या विविध कार्यक्रमात नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे,तसेच सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणारे सुरेश साखवळकर ,डॉ. संदीप श्रोत्री, सहाय्यक निबंधक राहुलजी देशमुख, संध्या चौगुले संस्थेचे कर सल्लागार
सी.ए.अजित रानडे, प्राचार्य विजयकुमार धुमाळ, श्रीराम नानल, यांचा सत्कार सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भोसले यांनी केले व रवींद्र कळसकर यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक आप्पा शालगर, संचालिका शिल्पा चिटणीस, अनिल चिटणीस, जगदीश खंडागळे ,प्राचार्य विजयकुमार धुमाळ ,स्नेहा रानडे ,अनिल वाळिंबे , चंद्रशेखर बैरागी,जयेंद्र जाधव, रवींद्र कळसकर,अभिनंदन मोरे,
आग्नेश शिंदे, लक्ष्मण कदम ,सागर पोगाडे, अभिजीत देवरे ,सचिन शिंदे, शुभम बल्लाळ ,रविराज जाधव, गौतम भोसले, दत्तात्रय शिर्के ,आनंदा ननावरे आदि उपस्थित होते.