Home » गुन्हा » महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर येते युवकाचा मृतदेह आढळून आला.

महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर बस स्थानक परिसरातील मयुरा गार्डन हॉटेलच्या पाठीमागील झाडीत संजय भगवान शिंदे वय 32 रा देवळी मुरा ता महाबळेश्वर येथील युवकाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे .

महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळाली माहिती. या युवकाला दारूचे व्यसन होते तीन दिवसा पूर्वी तो घरातून निघून गेला होता त्या दिवशी त्याला अनेकांनी शहरातील बाजार पेठेत व बस स्थानक परिसरात फिरताना पाहिले होते .आज बस स्थानका मागे आज दुर्गंधी सुटली होती अनेक चालक वाहक यांनी या बाबत तक्रार केली होती तक्रारी नुसार आज त्या परिसरात पाहिले असता संजय शिंदे याचा मृतदेह आढळून आला .संजय शिंदे याचा मृत्यू तीन दिवसा पूर्वी झाला असावा त्या मुळे त्याचे शव फुगले होते आणि दुर्गंधी सुटली होती .महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया अमित कोळी सुजित कोळी महेश गुजर व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने संजय शिंदे यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस निरिक्षक यशवत नलावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 91 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket