Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दर्पण’ हे बाळशास्त्रींचे एक लोकशिक्षणाचे माध्यम -इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे ,

दर्पण’ हे बाळशास्त्रींचे एक लोकशिक्षणाचे माध्यम -इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे ,

दर्पण’ हे बाळशास्त्रींचे एक लोकशिक्षणाचे माध्यम –इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे ,

खंडाळा येथे पत्रकार दिन साजरा

खंडाळा : मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यकाळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली. दर्पण हे बाळशास्त्रींचे एक लोकशिक्षणाचे माध्यम होते असे मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले. 

     खंडाळा येथील पंचायत समितीच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, विस्तार अधिकारी रमेश यादव, सुनील बोडरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पवार, श्रीकृष्ण यादव, राजेंद्र देशमुख, निलेश गायकवाड, संजय भरगुडे, आशा पवार, गणेश जाधव, मोहित देवधर यांसह प्रमुख उपस्थित होते. 

       दशरथ ननावरे म्हणाले, जांभेकरांनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग करुन घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली.  दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींनी चांगलेच जमविले. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.

      स्वागत युवराज मांढरे यांनी केले तर प्रकाश बोंबले यांनी आभार मानले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket