राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांपेक्षा ज्ञानदीप पतसंस्थेची जनसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याची कार्यपद्धती दिलासादायी आहे- नायब तहसीलदार सौ.वैशाली घोरपडे
वाई दि ३ :- राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांपेक्षा ज्ञानदीप पतसंस्थेची जनसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याची कार्यपद्धती दिलासादायी आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार सौ.वैशाली घोरपडे/जायगुडे मॅडम यांनी केले.
ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 46 व्या वर्धापन दिन, गुणवंत विद्यार्थी व ग्राहक गौरव कार्यक्रमात त्यांनी ज्ञानदीपच्या बँकिंग पद्धतीचे कौतुक केले.
व आरमोरीचे ( गडचिरोली )
पोलीस उपनिरीक्षक श्री.सूरज अनपट सा यांनी ज्ञानदीपने अनुभवातून एक मोठे बँकिंग विश्व निर्माण केल्याचे सांगितले.
प्रा.दत्तात्रय वाघचवरे सा म्हणाले, सहकारी तत्वे व व्यावसायिक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणारी ही संस्था सार्वजनिक हिताच्या कामांच्या पाठीशी सदैव उभी राहिली आहे. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ.शुभांगी पवार मॅडम, श्री.प्रशांत पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
स्ंस्थेच्या सचिव श्री.चंद्रकांत शिंदे म्हणाले, गृहनिर्माण क्षेत्रातील सिडकोसारख्या शासकीय संस्थेला वित्त पुरवठा करणा-या बँकांमध्ये ज्ञानदीपचे स्थान आहे. दैनंदिन ठेवीद्वारे दररोज पाच कोटी संकलन करणारी, ही विश्वासार्ह संस्था आहे.
कार्यक्रमात सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक, प्रशस्तिपत्र देऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत शाखा व्यवस्थापक श्री.मोहन गाढवे,अधिकारी श्री.प्रशांत कदम, व श्री.मनोज जगताप, क.अधिकारी सौ.उमा गायकवाड,प्रतिनिधी श्री.येवले, श्री.किरण पोळ,श्री.संकपाळ श्री.बळीराम गाढवे, श्री.खोमणे, श्री.चौधरी, श्री.बंटी नायकवडी व श्री.मुरूमकर यांनी स्वागत केले.
स्ंस्थेच्या संचालिका सौ.छाया शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर,माजी नगरसेवक राजेश गुरव, बांधकाम व्यावसायिक श्री.सुनील संकपाळ, श्री.प्रशांत पोळ, श्री.संतोष पवार, सौ.मुमताज पाटील,श्री.अजित पिसाळ, श्री.सुनील राजपुरे, श्री.प्रमोद पिसाळ, श्री.उदय पिसाळ,आदिनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे सर्व कर्मचारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी परीश्रम घेतले.