Home » राजकारण » छत्रपती घराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी 5 वर्षाने येते त्याचा लाभ घेत आमची साथ देणार रहिमतपूर मधील मुस्लिम समाजाची एकमुखी भूमिका.

छत्रपती घराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी 5 वर्षाने येते त्याचा लाभ घेत आमची साथ देणार रहिमतपूर मधील मुस्लिम समाजाची एकमुखी भूमिका.

छत्रपती घराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी 5 वर्षाने येते त्याचा लाभ घेत आमची साथ देणार. रहिमतपूर मधील मुस्लिम समाजाची एकमुखी भूमिका.

रहिमतपूर -छत्रपती घराणेचे आमच्यावरील प्रेमाचे प्रतीक म्हणजेच हि रहिमतपूर मधील शाही मस्जिद आहे आणि राजघराण्याच्या प्रेमच्यामुळेच आज ह्या शहरातील सर्वधर्मीय सर्वधर्मसमभाव जोपासत गुण्या गोविंदाने राहतात आणि छत्रपती शिवरायांचे विचार अंगिकारायचा प्रयत्न करत असतात. राजघराण्याच्या प्रेमामुळेच आणि छत्रपती शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीमुळेच सातारा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम हातात हात घालून जीवन जगत असतात आणि ह्या राजघराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी 5 वर्षाने येत असते आणि ह्या संधीचा लाभ घेत बहुतांशी मुस्लिम समाज छत्रपती उदयनराजे यांना साथ देणार असा निर्धार रहिमतपूर मुस्लिम समाजाने भेटी दरम्यान केला.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे भेटीसाठी आल्यांनतर शाही मस्जिदला भेट देण्याचे ठरविले, शाही मस्जिदीला भेटी दरम्यान मुस्लिम बांधवाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच शाही वजूचा हौद आणि रणदुल्लाखान यांच्या मकबरा ह्याला भेट दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील कदम, श्री मनोज घोरपडे, सौ चित्रलेखा माने, श्री संतोष कणसे, सादिकभाई शेख, इर्शाद बागवान उपस्थित होते. रहिमतपूर मुस्लिम जमातीचे चांद आतार ,आबिद सिद्दीकी ,मेहमूद शेख ,तौसिफ़ मुल्ला ,समीर मुल्ला ,नासिर शेख, सैफ शेख ,गफूर मुल्ला ,फैय्याज मुल्ला ,युंनूस शेख ,इरफान इनामदार ,आदिल मुल्ला ,सलमान मुल्ला ,साहिल संधे, अनिस मुल्ला आदी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket