गौरीशंकर बी फार्मसी लिंबच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश
लिंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड (लोणेरे) यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या बी फार्मसी परीक्षेत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये बी फार्मसी अंतिम वर्षातील क्रांती सुनील गायकवाड ,प्रणिल तात्यासाहेब राऊत, मेघा अशोक नरुटे, गौरी गणेश मारूमले, प्रथमेश जयंत मोरे या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले .
विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे महाविद्यालयाचा नांवलौकिक वाढविला असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.योगेश गुरव यांनी सांगितले महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयी सुविधा तज्ञ मार्गदर्शक उत्तम ग्रंथालय अद्यावत प्रयोगशाळा सुविधा यामुळे आम्हाला यश मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना डॉ.संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, प्रा. रोहन खुटाळे ,प्रा. शैलजा जाधव, प्रा.नीलम पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे ,आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व संस्थेचे कायदेशीर मॅनेजर रवी जगताप यांनी अभिनंदन केले .