सामाजिक, कृषी, राजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व तानाजी कचरे यांचा वाढदिवस विशेष
वाई प्रतिनिधी -वाई तालुक्यातील सामाजिक, राजकीय, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व म्हणजे श्री. तानाजी कचरे होय. वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायत बावधनचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य म्हणून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी निर्भीड आणि धडाडीच्या पत्रकार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रातील त्यांची आवड आणि कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
त्यांचा स्वभाव मनमिळावू, कार्यपद्धती अभ्यासू आणि जनतेशी असलेली नाळ घट्ट असल्याने समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो. विविध क्षेत्रात सक्रिय राहून समाजसेवेचे व्रत जपणारे तानाजी कचरे यांनी आपल्या कार्यातून अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!ईश्वर चरणी प्रार्थना की, त्यांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरभरून यश लाभो. 🎉




