Home » देश » धार्मिक » भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंजच्या श्री महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी होणार फलश्रुती चंडी याग

भुईंज :-शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी भुईंज ता. वाई येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सकाळी १०:३० वाजता फलश्रुती चंडी याग हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आदिशक्तीच्या या उपासना सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान समिती आणि श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र,भुईंज यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या आदिशक्ती उपासना सोहळ्याची माहिती देताना भुईंज येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्राच्या सौ.गंगाताई गाडे व सौ. विद्याताई किर्वे यांनी सांगितले की, चंडी-आदिशक्ती हे जगन्मातेचेच एक नाव आहे. विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला, आणि प्रलयाला कारणीभूत असणारी ही आदिशक्ती म्हणूनच चंडी उपासना म्हणजेच आपल्या कुलदेवतेची, ग्रामदेवीची उपासना होय. आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवीला प्रसन्न करण्यासाठी वेदशास्त्र, धर्मग्रंथ, पुराणामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामधील एक उपाय म्हणजे सप्तशती पाठ वाचन असल्यामुळे या चंडी याग सोहळ्यात सप्तशती पाठाचे वाचन केले जाणार आहे.

चंडी यज्ञ एक नव दुर्गा पूजा आहे. हि पूजा स्वास्थ्य, धन, शक्ति, समृद्धि, सफलता यासाठी केली जाते. चंडी यज्ञ सगळ्या कष्टांचे निवारण करते. मनुष्याला जीवनात सफलता मिळते. या यज्ञाला गणपती , भगवान शिव, नव ग्रह, नव दुर्गा (देवी) यांना समर्पित केल्याने मनुष्य जीवन धन्य होते, अशी भावना सौ.गंगाताई गाडे व सौ. विद्याताई किर्वे यांनी व्यक्त केली.

चंडी यज्ञ हवन एक असाधारण अतुलनीय आणि मोठा यज्ञ आहे जो देवीच्या शक्तींशी जोडतो. नवचंडी यज्ञ इतका शक्तिशाली आहे, की हा यज्ञ ग्रहांच्या स्थितीला आणि भाग्याला तुमच्या अनुकूल करण्यात मदत करतो. चंडी यज्ञ पूर्ण केल्यानंतर स्व:ताला दिव्य वातावरणात बघण्यासाठी आणि दिव्य देवी प्रसन्न होऊन मनाला शांतता प्राप्त होण्यासाठी सर्वांनी चंडी याग सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान समिती आणि श्री स्वामी समर्थ केंद्र,भुईंज यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 230 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket