एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प क्र.1 कोरेगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सुरु
सातारा दि. 22 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोरेगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक महिलांनी 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत.
साठेवाडी, भिवडी व बोधेवाडी चि. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची पद भरती करण्यात येणार आहे. तर वाठार कि, चिमनगाव कारखाना, धामनेर, धामनेर, कठापूर, नागझरी, शिरढोण, तांदुळवाडी, तांदुळवाडी, त्रिपुटी, वेळू व जळगाव या ठिकाणी अंगणवाडी सेवकांची पदभरती होणार आहे. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-1 भैरवनाथ कॉम्प्लेक्स, आझाद चौक कोरेगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी केले आहे.





