Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आणि दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित ” मराठी रंगभूमी दिन”

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आणि दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित ” मराठी रंगभूमी दिन”  

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आणि दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित ” मराठी रंगभूमी दिन”  

सातारा दि.4 (प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा आयोजित नाटकवेड्या मराठी जणांनो, चला साजरा करूया “मराठी रंगभूमी दिन” कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृतिक हॉल 759 अ, शनिवार पेठ सातारा येथे मंगळवार दि.5 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.00वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये डॉ. निलेश माने यांनी लिहिलेल्या लेबल या एकांकिकेला अ.भा. नाट्यपरिषदेच्या 100 व्या नाट्य संमेलनामध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त त्यांचा सदर कार्यक्रमांमध्ये सत्कार आयोजित केला आहे”तसेच धैर्या विनोद कुलकर्णी हिने वयाच्या अवघ्या 12 वर्षी आई-वडिलांशिवाय आफ्रिका खंडातील सर्वोच्च उंचीचे किलीमांजरो” शिखर भारताचा झेंडा फडकून सर करणारी भारत देशातील पहिली मुलगी ठरली आहे .त्याबद्दल तिचा ही सत्कार मान्यवर तर्फे करण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये , संपादक ,लेखक व पत्रकार मुकुंद फडके ,संयोजक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा चे अध्यक्ष शिरीष चिटणीस, तसेच उपाध्यक्ष अशोक काळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सातारचे हरहुन्नरी कलावंत स्नेहा धडवई, रवीना गोगावले आणि अंकिता दनाने यांचे एकपात्री सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे.या तिन्ही अभिनेत्रींनी अभिनयाचे राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत. कार्यक्रमात समाविष्ट केलेला एकपात्री प्रयोगही पुरस्कार प्राप्त आहे.तरी रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये, संयोजक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा चे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि उपाध्यक्ष अशोक काळे यांनी आयोजित केलेल्या “मराठी रंगभूमी दिन”कार्यक्रमास समस्त सातारकर यांनी यावे असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 71 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket