हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली
अजित पवारांना धक्का! मुंडेंनंतर एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वरिष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही त्यांनी काही महिन्यांतच पदाचा राजीनामा दिल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
प्रवासाचा मोठा अडथळा? :
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आमदार असून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणे त्यांच्यासाठी कठीण जात होते. कोल्हापूर ते वाशिम हा जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास आहे, त्यामुळे त्यांचा बराच वेळ या प्रवासात जात होता. याचा परिणाम त्यांच्या मूळ मतदारसंघातील कामांवर होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
