येवती जिल्हा परिषद केंद्र शाळेचा अनोखा उपक्रम चक्क बैलगाडीतून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत मिरवणूक काढून केले जंगी स्वागत
कराड (प्रतिनिधी)येवती ता. कराड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येवती या शाळेने अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी जंगी स्वागत केले, यामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या स्कूल कमिटीच्या वतीने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या व आपल्या आयुष्यामध्ये शाळेची पहिली पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढून शाळेमध्ये दाखल करून स्वागत करण्यात आले, यावेळी स्कूल कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र शेवाळे व स्कूल कमिटीच्या संकल्पनेतून हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
यावेळी स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कालच्या आधुनिक युगामध्ये देखील भारतीय संस्कृतीची परंपरा आबादीत राहावी व येणारी नवीन पिढी देखील आदर्श व संस्कारिक घडावी या दृष्टिकोनातून हा राबवलेला उपक्रम खरोखरच आदर्शवत आहे .




