विकास कामांचा डोंगर उभा करून दूरदृष्टी असलेला नेता – नितीन (बापू) भरगुडे पाटील
पळशी (ता. खंडाळा) –सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि पळशी गावाचे कुटुंब प्रमुख सन्माननीय श्री नितीनकुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील (उर्फ बापू) यांनी पुन्हा एकदा आपल्या विकासदृष्टीने गावाच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून बापूंनी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर शेकडो विकासकामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. आपल्या प्रपंचाचा, तब्येतीचा किंवा स्वार्थाचा विचार न करता फक्त गाव, जनता आणि विकास यांनाच प्राधान्य देणाऱ्या या नेत्यामुळे आज पळशी गाव महाराष्ट्राच्या नकाशावर विकासकामांनी गजबजलेले गाव म्हणून ओळखले जाते.
अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार श्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने “जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे पळशी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवला जाणार आहे.
या निर्णयासाठी मंत्रालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत आमदार मकरंद पाटील, मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये पळशी गावाच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाचे सादरीकरण एका महिन्यात करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर सहा कोटींच्या निधीस तातडीने मंजुरी दिली जाणार आहे.
सध्या बापू हे गंभीर आजारातून सावरण्याच्या मार्गावर आहेत, तरीही त्यांनी आपल्या गावाच्या विकासकामांपासून कधीच पाठ फिरवली नाही.
“पहिले माझे गाव, मग जिल्हा आणि शेवटी माझा प्रपंच” अशी त्यांची कार्यपद्धती आहे.
गावकऱ्यांच्या मते – “कौतुकाची अपेक्षा न करणारा, पण विकास कामांचा डोंगर उभा करणारा नेता म्हणजेच आमचे बापू.
गावकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बापूंना उत्तम आरोग्य लाभावे आणि भविष्यात जिल्हा व राज्याच्या विकासासाठी त्यांना आणखी मोठ्या पदावर कार्य करण्याची संधी मिळावी, अशी परमेश्वराकडे प्रार्थना व्यक्त केली आहे.
